Wednesday, January 19, 2011

झिंग चेsssक झिंग

रेश्मी आठवणींच्या सुवर्णमूद्रा,
मरणार्याच्या मढ्यावर ’स्वाहा:’ म्हणून कधि म्हणू नये
हा मेला तो गेला ह्यात कधि अडकूनहि पडू नये,
पण…
जगणारयाचि फिलोसोफि, बेस्ट सेलर म्ह्णून
त्याच्याच तेराव्याला विकू नये.

म्हट्ले तर शब्द, म्हटले तर भावना, 
म्हट्ले तर शब्द, म्हटले तर भावना,
गरजेला नाहि सापडले हे “जोडपे” तर, 
’शंका’सूराच्या तांडवात पायदळि तरी तूड्वू नये.
आणि म्हणून…. झोपेच्या आधि जड डोके कधि असू नये,
उठल्यावर मात्र “भूतकाळा”च्या वर्तमान पत्रावर शब्दच काहि सुचू नयेत.


हल्लि म्हणे धमन्यांतुन धाऊन उसळत,
डोक्यात ’तरंगते बेट’ गाठणारी ’ती’ सुन्नच असते.

मर्दूमकिच्या काठाला शरिराने बांधुन हलकेच हेलकावे घेणारी,
उथळ रक्तातली, नितळ ’ती’ आज सकाळी
उतारयाचा पेगहि प्यावा लागला नाहि म्ह्णून,
कुठल्यातरी मोरीचा कोपरा धुवत बसलेली असते.  आणि म्हणून….

झोपेच्या आधि जड डोके कधि असू नये,
उठल्यावर मात्र “भूतकाळा”च्या वर्तमान पत्रावर शब्दच काहि सुचू नयेत.


तुझ्या ह्या आकाशवाणिने बघतो आता,
खरखरणा-या माझ्या रेडिओवर शांत झोपेचे स्टेशन लागते का ते!

जगण्याच्या या कमर्शियल ब्रेक वर,
सुखि: माणसाच्या गोष्टित सुखा:न्तिकेचा पाळणा जोजवते का ते!

आणि म्हणून…. झोपेच्या आधि जड डोके कधि असू नये,
उठल्यावर मात्र “भूतकाळा”च्या वर्तमान पत्रावर शब्दच काहि सुचू नयेत
.
                                                                                              मंगेश साळवी.

No comments: