by Mangya Sal on Thursday, December 30, 2010 at 3:58am
सण साले स्वत: वाइन्डे असतात,
येणार येणार म्ह्णून खूप वाट बघायला लावतात,
आले कि साले चार दिवसात प्रकाश करुन धुम पळून जातात,
वाटे कडे त्यांच्या डोळे लावले... तर, वेडा आहेस का?,
तूळशीच्या लग्नापर्यंत आम्ही रेंगाळणार म्हणतात.
सण साले स्वत: वाइन्डे असतात
दिव्या खालचा अंधार, भूईमूगाचे सत्व, नाजूक कापसांची पिळवटलेली आतडी
रस्व दिर्घ म्हणीत ह्याच मातिच्या ओंजळीत,
स्वता: जळत डोळ्यांना मात्र मिणमिणतांना दिसतात
स्वता: जळत डोळ्यांना मात्र मिणमिणतांना दिसतात
उष:काल होण्या आधिचा अंधार मात्र... दिवस म्ह्णून साजरा करा!
असे सूगंधी-आशेचे उट्णे पण लावतात.
असे सूगंधी-आशेचे उट्णे पण लावतात.
सण साले स्वत: वाइन्डे असतात येणार येणार म्ह्णून खूप वाट बघायला लावतात,
आले कि साले चार दिवसात प्रकाश करुन धुम पळून जातात
पूढ्च्या खेपे पर्यंत दरवाज्यात लोम्बत फासावर लटकवलेले चुरचूरणारे वार्धक्याचे पान
त्याच्याच हिरव्या-गार केसरी-पिवळ्या बालपणानं,
नक्ळत डोक्याला पावित्र स्पर्शून गेले म्ह्णून
नक्ळत डोक्याला पावित्र स्पर्शून गेले म्ह्णून
सनईचे तेच ते रडू करायला लावतात बेभान...
सण साले स्वत: वाइन्डे असतात, येणार येणार म्ह्णून खूप वाट बघायला लावतात,
आले कि साले चार दिवसात प्रकाश करुन धुम पळून जातात
साले येतात तर येतात, अंधारात खूप रेंगाळत खोलवर रूतून राहतात,
बंद डोळ्याबाहेरचा प्रकाश पाहाटेच्या स्वप्नांची राखरांगोळी करून जातात,
एका चिमटितंन निसटलेल्या वळ्णा-वळ्णा वरच्या अनेक रंगिबेरंगी क्षणांची रांगोळि
एका चिमटितंन निसटलेल्या वळ्णा-वळ्णा वरच्या अनेक रंगिबेरंगी क्षणांची रांगोळि
कुठल्यातरी लहरी वा-याच्या झूळकेला,
कृष्ण-लिलांचा वास्तादेऊन,
कृष्ण-लिलांचा वास्तादेऊन,
बिघडवलेल्या त्याच रांगोळीला रौद्र समूद्राच्य़ा लाटांची
सळसळती किनार दाखऊन जातात
सळसळती किनार दाखऊन जातात
सण साले स्वत: वाइन्डे असतात
येणार येणार म्ह्णून खूप वाट बघायला लावतात,
आले कि साले चार दिवसात प्रकाश करुन धुम पळून जातात
स्वत:साले साजरे होतात,
अंतापर्यंत साले हाती धूपाटणं देऊन, दिव्याच्या सत्वाची भिक मागायला लावतात
सण साले स्वत: वाइन्डे असतात... सण साले स्वत: वाइन्डे असतात
मंगेश साळवी
No comments:
Post a Comment